बातम्या
कळंबा साई मंदिर परिसरातील २५ अनधिकृत हातगाड्यांवर महापालिकेचा हातोडा!
By nisha patil - 2/10/2026 4:01:39 PM
Share This News:
कळंबा साई मंदिर परिसरातील २५ अनधिकृत हातगाड्यांवर महापालिकेचा हातोडा!
कळंबा येथील साई मंदिर परिसरात महापालिकेच्या जागेवर उभारण्यात आलेल्या २५ अनधिकृत हातगाड्यांवर कोल्हापूर महानगरपालिकेने धडक कारवाई केली. महापालिकेच्या उपद्रव शोध पथक, विभागीय कार्यालय क्रमांक १ (गांधी मैदान) तसेच इस्टेट व अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली.
कारवाई सुरू होताच काही हातगाडीधारक आणि विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांनी स्वतःहून आपले साहित्य हटविले. मात्र, महापालिकेकडून वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण न हटविणाऱ्या व्यावसायिकांवर प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली. यावेळी त्यांचे अनधिकृत साहित्यही जप्त करण्यात आले.
अनधिकृत व्यवसाय आणि अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी जप्त केलेले साहित्य संबंधित व्यावसायिकांना परत न करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे आजच्या कारवाईत जप्त करण्यात आलेले साहित्य कायमस्वरूपी जप्त करण्यात आले. ही कारवाई महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या आदेशाने आणि उपआयुक्त किरणकुमार धनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईमध्ये सहायक आयुक्त उज्वला शिंदे, कनिष्ठ अभियंता अनिरुद्ध कोरडे, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक रवी कांबळे यांच्यासह अतिक्रमण निर्मूलन पथक, उपद्रव शोध पथक, इस्टेट विभाग आणि विभागीय कार्यालय क्रमांक १ मधील कर्मचारी सहभागी झाले होते.
कळंबा साई मंदिर परिसरातील २५ अनधिकृत हातगाड्यांवर महापालिकेचा हातोडा!
|