बातम्या

नवरात्रोत्सवाआधी महापालिकेचा दणका! भवानी मंडपातील अतिक्रमणांवर कारवाई

Municipal Corporation cracks down ahead


By nisha patil - 10/10/2026 3:24:44 PM
Share This News:



नवरात्रोत्सवाआधी महापालिकेचा दणका! भवानी मंडपातील अतिक्रमणांवर कारवाई

 

कोल्हापुरातील भवानी मंडप परिसरात महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक दोन आणि अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. यावेळी एक हातगाडी, पाच स्टँड बोर्ड, पाच स्टील काऊंटर, लोखंडी टेबल, पार्किंग जाळी, तंबू, फायबर खुर्च्या, स्टूल आणि ओटीचे २२ नग यांसह विविध साहित्य जप्त करण्यात आले.

विशेष म्हणजे, जप्त केलेले साहित्य संबंधित व्यावसायिकांना परत दिले जाणार नसून ते कायमस्वरूपी जप्त करण्यात आल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या आदेशानुसार आणि उपआयुक्त किरणकुमार धनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. दरम्यान, शहरातील अनधिकृत फेरीवाले, व्यावसायिक आणि रस्त्यांवरील अतिक्रमणांविरोधातील कारवाई यापुढे अधिक तीव्र करण्यात येणार आहे. त्यामुळे अतिक्रमणे स्वतःहून हटवावीत, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा महापालिकेने दिला आहे.


नवरात्रोत्सवाआधी महापालिकेचा दणका! भवानी मंडपातील अतिक्रमणांवर कारवाई
Total Views: 13