बातम्या
लीशा हॉटेल ते कदमवाडी रोडवर महापालिकेचा हातोडा! अनधिकृत शेड जमीनदोस्त!
By nisha patil - 11/18/2026 3:07:23 PM
Share This News:
लीशा हॉटेल ते कदमवाडी रोडवर महापालिकेचा हातोडा! अनधिकृत शेड जमीनदोस्त!
कोल्हापूर शहरातील लीशा हॉटेल रोड ते कदमवाडी रस्त्यावरील व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिकांनी रस्त्यालगतच्या फ्रंट सेडबॅक जागेत विनापरवाना पत्रा शेड उभारून त्याचा व्यावसायिक वापर सुरू केला होता. याबाबत महापालिकेच्या नगररचना विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत महापालिकेने संबंधित मिळकतधारकांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५३ अंतर्गत नोटिसा बजावल्या होत्या. तसेच सुनावणी घेऊन अनधिकृत बांधकामे स्वतःहून हटविण्याचे आदेशही देण्यात आले होते.
मात्र, नोटीस आणि आदेश देऊनही संबंधितांनी अतिक्रमणे हटवली नाहीत. त्यामुळे अखेर महापालिकेच्या उपद्रव शोध पथक, नगररचना विभाग आणि विभागीय कार्यालय क्रमांक चारच्या संयुक्त पथकाने प्रत्यक्ष कारवाई करत अनधिकृत पत्रा शेड निष्कासित केले. आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या आदेशाने आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
लीशा हॉटेल ते कदमवाडी रोडवर महापालिकेचा हातोडा! अनधिकृत शेड जमीनदोस्त!
|