विशेष बातम्या
महापालिकेची डेंग्यू विरोधात मोहिम..
By nisha patil - 5/26/2025 4:37:05 PM
Share This News:
महापालिकेची डेंग्यू विरोधात मोहिम..
फवारणी, स्वच्छता, जागृतीला प्राधान्य
राजारामपुरीत घरोघरी जाऊन डेंग्यू जनजागृती
कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने डेंग्यू प्रतिबंधासाठी शहरभर विविध ठिकाणी सक्रिय पावले उचलली आहेत. गांधी मैदान परिसरात औषध व धूर फवारणी करण्यात आली आहे. तपोवन भागातील बांधिव चॅनेलची स्वच्छता करून डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
त्याचबरोबर, राजारामपुरी आणि शाहूनगर परिसरात आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत व नागरिकांना डेंग्यू प्रतिबंधक उपायांची माहिती देत जागृती करत आहेत. UPHC क्र. 3 राजारामपुरी व UPHC क्र. 7 आयसोलेशन च्या अंतर्गत ही मोहीम राबवली जात आहे. डेंग्यूमुळे वाढणाऱ्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम प्रभावी ठरते आहे.
महापालिकेची डेंग्यू विरोधात मोहिम..
|