बातम्या
नगरपरिषद निवडणुकीचा धडाका! जिल्हाधिकारी येडगे यांचा मतदान केंद्रांना सक्त दौरा; स्ट्राँग रूमचीही तपासणी
By nisha patil - 11/29/2025 3:43:10 PM
Share This News:
नगरपरिषद निवडणुकीचा धडाका! जिल्हाधिकारी येडगे यांचा मतदान केंद्रांना सक्त दौरा; स्ट्राँग रूमचीही तपासणी
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शहरातील विविध मतदान केंद्रांना अचानक भेटी देत तयारीची पाहणी केली. मतदान प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याशिवाय, सुव्यवस्थित आणि पारदर्शक रितीने पार पडावी यासाठी प्रत्येक केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत का, याची त्यांनी सखोल तपासणी केली.
येडगे यांनी सील केलेल्या मतदान यंत्रणा ठेवलेल्या स्ट्राँग रूमचीही पाहणी करून सुरक्षा यंत्रणेला स्पष्ट निर्देश दिले. मतमोजणीच्या ठिकाणी करावयाच्या व्यवस्थेचीही त्यांनी पाहणी करत मार्गदर्शक सूचना दिल्या.
यादरम्यान, नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात निवडणूक कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमालाही त्यांनी भेट दिली. “निवडणूक प्रक्रिया बिनचूक, पारदर्शक व शिस्तबद्ध व्हावी. प्रशिक्षण गंभीरपणे घ्या आणि चूक-त्रुटीला वाव देऊ नका,” असे आवाहन त्यांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांना केले.
या पाहणी दौऱ्यात सहआयुक्त नागेंद्र मुतकेकर, निवडणूक निर्णय अधिकारी तेजस्विनी खोचरे-पाटील, सहाय्यक निवडणूक अधिकारी आतिश वाळुंज आदी उपस्थित होते.
नगरपरिषद निवडणुकीचा धडाका! जिल्हाधिकारी येडगे यांचा मतदान केंद्रांना सक्त दौरा; स्ट्राँग रूमचीही तपासणी
|