बातम्या
महापालिकेच्या आरोग्य विभागाला दोन जेसीबीची ताकद; साडेसात लाखांची बचत!
By nisha patil - 9/16/2026 9:53:13 PM
Share This News:
महापालिकेच्या आरोग्य विभागाला दोन जेसीबीची ताकद; साडेसात लाखांची बचत!
कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या ताफ्यात आता आणखी दोन जेसीबी दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे, यातील एक जेसीबी तब्बल तीन वर्षांपासून बंद होता. मात्र, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अवघ्या अडीच लाख रुपयांत त्याची दुरुस्ती करून पुन्हा सेवेत आणला आहे. नवीन जेसीबी थ्रीडी एक्स बॅकहो लोडरचे लोकार्पण महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते करण्यात आले. तर तीन वर्षांपासून बंद असलेल्या टाटा हिताची कंपनीच्या जेसीबीची महापालिकेच्या यंत्रशाळेतच ओव्हरहॉलिंग करून दुरुस्ती करण्यात आली.
विशेष म्हणजे, कंपनीने या जेसीबीचे इंजिन बदलण्याचा सल्ला देत तब्बल दहा लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले होते. मात्र, महापालिकेच्या कुशल कर्मचाऱ्यांनी तांत्रिक कौशल्याच्या जोरावर अवघ्या अडीच लाखांत दुरुस्ती केली. त्यामुळे महापालिकेचे तब्बल साडेसात लाख रुपये वाचले आहेत. या दोन जेसीबीमुळे शहरातील कचरा उठाव, स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनाला गती मिळणार आहे. आता आरोग्य विभागाकडे दैनंदिन कामकाजासाठी एकूण सहा जेसीबी उपलब्ध झाले आहेत.
महापालिकेच्या आरोग्य विभागाला दोन जेसीबीची ताकद; साडेसात लाखांची बचत!
|