राजकीय

२०२६ ला महानगरपालिकेच्या निवडणूका

Municipal elections in 2026


By nisha patil - 5/8/2025 5:12:11 PM
Share This News:



२०२६ ला महानगरपालिकेच्या निवडणूका 

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी माहिती दिली आहे की या निवडणुका दिवाळीनंतर म्हणजेच डिसेंबर-जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे.

या निवडणुकीत व्हिव्हिपॅट मशीनचा वापर केला जाणार नाही तसेच टप्प्याटप्प्याने निवडणुका पार पाडल्या जाणार असल्याची माहितीही आयोगाने दिली आहे.

सोमवारी राज्य सरकारने नवीन प्रभाग रचना व ओबीसी आरक्षणासह निवडणुकांना मंजुरी दिली. यापूर्वी या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या, त्यामुळे निवडणुकांना आता कायदेशीर अडथळा राहिलेला नाही.

मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक या मोठ्या महापालिकांमध्ये प्रभाग रचनेत काही बदल करण्यात आले होते. यावरून काही याचिका दाखल करण्यात आल्या होत्या, मात्र त्याही फेटाळल्यामुळे आता राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नव्या रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राजकीय घडामोडींनी भरलेल्या या निवडणुका राज्यातील सत्तासंस्थांसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.


२०२६ ला महानगरपालिकेच्या निवडणूका
Total Views: 130