बातम्या
विवेकानंद कॉलेजमध्ये महानगरपालिकास्तर वुशू स्पर्धा उत्साहात
By nisha patil - 9/18/2025 4:44:58 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये महानगरपालिकास्तर वुशू स्पर्धा उत्साहात
कोल्हापूर दि.18 कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर व विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर यांच्यावतीने श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या शिक्षणमहर्षी डॉ. बापुजी साळुंखे स्मृतीभवन येथे पार पडल्या. सदर स्पर्धेचे उद्घाटन विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार याच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
उद्घाटनाचे प्रास्ताविक कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर चे क्रीडा निरीक्षक श्री सचिन पांडव यांनी केले तर प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर वुशू असो. चे अध्यक्ष श्री. अविनाश पाटील, डॉ. महेश कदम, श्री. लहू अंगज सर्व शाळेचे क्रीडा शिक्षक, वुशू असो. पंच व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व कोल्हापूर शहरातील जवळपासस एकूण 110 विद्यार्थी या स्पर्धेसाठी सहभागी झाले होते. या स्पर्धा 14 वर्षाखालील, 17 वर्षाखालील व 19 वर्षाखालील मुले व मुली सहभागी होते.
सर्व स्पर्धेचे नियोजन विवेकानंद महाविद्यालयाचे क्रीडा व शारारीक संचालक प्रा. संतोष कुंडले, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. समीर पठाण , प्रा. साद मुजावर व श्री. सुरेश चरापले यांनी केले. सदर स्पर्धेचे सूत्र संचालन प्रा. संतोष कुंडले यांनी केले तर आभार प्रा. साद मुजावर यांनी मांडले.
विवेकानंद कॉलेजमध्ये महानगरपालिकास्तर वुशू स्पर्धा उत्साहात
|