राजकीय
कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका–नगरपंचायत निकाल जाहीर, शिंदे गटाची सरशी
By nisha patil - 12/21/2025 12:52:19 PM
Share This News:
कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिकां व नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून एकूण १३ जागांवर विजयी उमेदवार निश्चित झाले आहेत.
या निकालांमध्ये शिवसेना (शिंदे गट) सर्वाधिक ५ जागांवर विजयी ठरली असून जयसिंगपूर, हातकणंगले, शिरोळ, मुरगूड आणि कुरुंदवाड येथे पक्षाने यश मिळवले आहे. भाजपने ३ जागांवर विजय मिळवत चंदगड, हुबळी आणि आजरा येथे आपली उपस्थिती नोंदवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने गडहिंग्लज आणि कागल या दोन ठिकाणी बाजी मारली आहे. तसेच जनसुराज व इतर स्थानिक आघाड्यांनी पन्हाळा आणि मलकापूर येथे प्रत्येकी एक अशा दोन जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसला पेठवडगाव येथे एकमेव जागा मिळाली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि मनसे यांना एकही जागा मिळालेली नाही. या निकालांमुळे जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका–नगरपंचायत निकाल जाहीर, शिंदे गटाची सरशी
|