बातम्या

पेठ वडगावात नवरात्रीतच खुनी हल्ला – नागरिकांत भीतीचे वातावरण

Murderous attack in Peth Vadgaon during Navratri


By nisha patil - 9/25/2025 12:12:31 PM
Share This News:



पेठ वडगावात नवरात्रीतच खुनी हल्ला – नागरिकांत भीतीचे वातावरण

प्रतिनिधी  किशोर जासूद  अंबप (ता. हातकणंगले) : शहरातील कुख्यात गुंड शुभम संजय शिंदे उर्फ तलवार बंड्या, जो सध्या कोल्हापूर जिल्हा हद्दपार आहे, त्याने आपल्या साथीदाराच्या मदतीने कोल्हापूर रोडवरील विजय वाईन्स (गणेश मंदिराशेजारी) येथे खुनी हल्ला केला.

या हल्ल्यात अमोल रामचंद्र काळे हा गंभीर जखमी झाला (वय39) असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

नवरात्रीच्या काळातच झालेल्या या घटनेमुळे शहरात दहशतीचे सावट पसरले असून नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही गंभीर घटना मानली जात आहे.


पेठ वडगावात नवरात्रीतच खुनी हल्ला – नागरिकांत भीतीचे वातावरण
Total Views: 47