राजकीय

मुरगुड नगरपरिषद निवडणूक 2025 : सुहासिनी पाटील यांच्या प्रचारार्थ अंबाबाई मंदिर येथे महायुतीची कोपरा सभा

Murgud Municipal Council Election 2025


By nisha patil - 11/30/2025 1:32:22 PM
Share This News:



मुरगुड:- स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर मुरगुड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. सुहासिनी प्रवीणसिंह पाटील आणि महायुतीच्या नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ येथील श्री अंबाबाई मंदिर परिसरात भव्य कोपरा सभा उत्साहात पार पडली. या सभेस भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, प्रवीणसिंह पाटील आणि वीरेंद्र मंडलिक यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

सभेदरम्यान महायुतीच्या नेत्यांनी नगरपरिषदेसाठीच्या आगामी योजना, विकासकामे आणि मतदारांना भेडसावणाऱ्या स्थानिक प्रश्नांवर भाष्य करत नागरिकांशी सरळ संवाद साधला. आगामी निवडणुकीत एकजुटीने काम करून मुरगुड शहराचा सर्वांगीण विकास करणार असल्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमास इतर मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. सभेतील उत्साह, घोषणाबाजी आणि महायुतीच्या नेत्यांचा आत्मविश्वास यामुळे निवडणुकीच्या वातावरणात आणखी चुरस निर्माण झाली आहे.


मुरगुड नगरपरिषद निवडणूक 2025 : सुहासिनी पाटील यांच्या प्रचारार्थ अंबाबाई मंदिर येथे महायुतीची कोपरा सभा
Total Views: 33