बातम्या

श्रीमती रेखाताई आनंदा मांगले यांची मुरगूड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी निवड

Murgud nagararishad


By nisha patil - 8/1/2026 4:24:35 PM
Share This News:



श्रीमती रेखाताई आनंदा मांगले यांची मुरगूड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी निवड

तारा न्यूज प्रतिनिधी _मुरगूड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी श्रीमती रेखाताई आनंदा मांगले यांची निवड झाल्याबद्दल मुरगूड शहरात सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सामाजिक कार्याची भक्कम जाण, प्रशासनातील अनुभव तसेच विकासाभिमुख आणि लोकाभिमुख दृष्टिकोन यामुळेच त्यांची या पदावर निवड झाल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मुरगूड नगरपरिषदेमार्फत शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.

या निवडीनंतर मुरगूड शहरातील विविध सामाजिक, राजकीय संघटना, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या असून, नगरपरिषदेतून राबविण्यात येणाऱ्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


श्रीमती रेखाताई आनंदा मांगले यांची मुरगूड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी निवड
Total Views: 48