बातम्या
मुरगूड पतासंस्थेच्या आजरा शाखेचे धडाक्यात उदघाट्न
By nisha patil - 1/5/2026 7:51:24 PM
Share This News:
**मुरगूड पतासंस्थेच्या आजरा शाखेचे धडाक्यात उदघाट्न*
**आजरा(हसन तकीलदार)*:-मुरगूड नागरी सहकारी पत संस्था ता. कागल या पत संस्थेच्या आजरा शाखेचा उदघाट्न सोहळा अण्णाभाऊ संस्था समूहाचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांचे शुभ हस्ते अगदी धडाक्यात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक हाजी बाळासाहेब मकानदार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून निजामभाई लाडजी (उद्योजक -आजरा गोवा ), सुजय येजरे (सहाय्य्क निबंधक, आजरा) हे उपस्थित होते.
दीड वर्षांपूर्वी मुरगूड येथे मुरगूड नागरी सह. पत संस्थेची स्थापना जावेदभाई मकानदार यांनी केली. 31 मार्च 2026 अखेर अल्पावधीतच 15 कोटी 24 लाख ठेविंचा टप्पा पार करीत 11 कोटी 40 लाख कर्जे व सोनेतारण 5 कोटी 24 लाख पर्यंतची कर्जे वितरीत करणेत आली आहेत.
सभासदांच्या सोयीकरिता 20 ऑगस्ट 2025 रोजी लिंगनूर ता. कागल येथे सभासद सेवा केंद्र सुरु करण्यात आले आहे आणि आता 1 मे 2026 रोजी आजरा येथे पत संस्थेच्या शाखेचे उदघाट्न झाले आहे. येणाऱ्या काळात आदमापूर ता. भुदरगड येथे आणखीन एक सभासद सेवा केंद्र सुरु करण्यात येणार आहे. याची मंजुरी मिळाली आहे. सभासद, ठेवीदार, कर्जदार आणि हितचिंतक यांच्या सहकार्याने संस्थेची घोडदौड अशीच सुरु राहणार असे संस्थापक चेअरमन जावेदभाई मकानदार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
यावेळी संभाजी पाटील (उपजिल्हाप्रमुख शिवसेना उबाठा), दशरथ अमृते (आजरा साखर कारखाना माजी संचालक), हाजी रशीद पठाण(कारखाना संचालक),समिर गुंजाटी, निसारभाई लाडजी, जुबेरभाई चांद,हाजी मुनाफ खेडेकर, मजीद मुराद, नविज खेडेकर, असिफ सोनेखान, सिकंदर दरवाजकर, महंमद लाडजी(एम. डी.), नौशादभाई बुडडेखान,समिर चांद (शिवसेना उबाठा )
आदिजण उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन शाखाधिकारी मोहसीन मुराद यांनी केले.
मुरगूड पतासंस्थेच्या आजरा शाखेचे धडाक्यात उदघाट्न
|