बातम्या
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा कोल्हापूर दौरा
By Administrator - 4/11/2025 8:26:44 PM
Share This News:
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा कोल्हापूर दौरा
पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांना दिली सदिच्छा भेट
कोल्हापूर : केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ हे कोल्हापूर दौऱ्यावर आले असता छत्रपती राजाराम महाराज विमानतळ येथे भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन घेऊन राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
यानंतर मंत्री मोहोळ यांनी पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या वेळी पुढारीचे संपादक योगेश जाधव, भाजपा महानगराध्यक्ष विजय जाधव, महादेव दिंडे, विराज चिखलीकर, विश्वजीत पवार, वल्लभ देसाई, सुमित पारखे यांसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा कोल्हापूर दौरा
|