राजकीय

"मुश्रीफांची मेगा कोपरा सभा; प्रभाग ८ मध्ये गर्दीचा महा स्फोट !"

Mushrifs mega corner meeting huge crowd explosion in Ward 8


By nisha patil - 11/27/2025 5:52:09 PM
Share This News:



गडहिंग्लज : प्रभाग क्रमांक ८ मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य कोपरा सभा; हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत उत्साह ओसंडून वाहत होता.

गडहिंग्लज येथे प्रभाग क्र. ८ च्या उमेदवार शबनम सय्यद व महेश सलवादे यांच्या प्रचारार्थ भव्य कोपरा सभा पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे या सभेला प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सभास्थळी नागरिकांचा गर्दीचा महापूर उसळल्याने उमेदवारांविषयी असलेला जनतेचा विश्वास स्पष्ट दिसून आला.

 

यानंतर भाषणात मार्गदर्शन करताना  , विरोधकांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री तसेच चंद्रकांतदादा पाटील गडहिंग्लजला भेट देणार असले तरी त्यांच्या अमिषाला बळी पडू नका. “विकास हवा असेल तर राष्ट्रवादीच्या चिन्हावर मतदान करा,” असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

शबनम सय्यद व महेश सलवादे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रभाग क्रमांक ८ मध्ये विकासाचा नवा अध्याय सुरू होणार, असा विश्वास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.


"मुश्रीफांची मेगा कोपरा सभा; प्रभाग ८ मध्ये गर्दीचा महा स्फोट !"
Total Views: 23