बातम्या
महिला डॉक्टरचा हिजाब ओढल्याच्या आरोपावरून समस्त मुस्लिम युवा समाज, कोल्हापूर यांचा राष्ट्रपतींना निषेध निवेदन
By nisha patil - 12/22/2025 4:34:13 PM
Share This News:
महिला डॉक्टरचा हिजाब ओढल्याच्या आरोपावरून समस्त मुस्लिम युवा समाज, कोल्हापूर यांचा राष्ट्रपतींना निषेध निवेदन
कोल्हापूर – समस्त मुस्लिम युवा समाज, कोल्हापूर यांच्या वतीने आज मा. राष्ट्रपती महोदया यांना जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्या मार्फत निषेध निवेदन सादर करण्यात आले. बिहार राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सार्वजनिक ठिकाणी एका महिला डॉक्टरचा हिजाब ओढल्याचा आरोप असलेली घटना अत्यंत लज्जास्पद, स्त्रीविरोधी व संविधानविरोधी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या कथित कृत्यामुळे महिलांच्या सन्मानावर, धार्मिक स्वातंत्र्यावर व मूलभूत अधिकारांवर आघात झाला असून संपूर्ण मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचे संघटनेने म्हटले आहे. या प्रकरणाची तातडीने निष्पक्ष चौकशी करून दोषींवर पदाची पर्वा न करता कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच महिलांचा सन्मान आणि सर्व धर्मीयांचे धार्मिक स्वातंत्र्य अबाधित ठेवावे, अशीही विनंती करण्यात आली.
यावेळी फजल मुजावर, हसरत मुल्ला, नौशाद मणेर, युसुफ शेख, आरिफ मुल्लानी, इरफान पठाण, शरीफ सुतार, जुबेर शेख, जहीर जमादार, सोहेल बागवान, शहीद मोमिन व तौफिक शेख उपस्थित होते.
महिला डॉक्टरचा हिजाब ओढल्याच्या आरोपावरून समस्त मुस्लिम युवा समाज, कोल्हापूर यांचा राष्ट्रपतींना निषेध निवेदन
|