बातम्या
📰 ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा सन्मान निधी खात्यात जमा; महिलांसाठी दिवाळीची गोड भेट!
By nisha patil - 11/10/2025 12:26:32 PM
Share This News:
मुंबई :
राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
महिलांसाठी हीच खरी दिवाळीची गोड भेट ठरली आहे.
अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे निधी वेळेत मिळेल की नाही, याबद्दल संभ्रम होता.
मात्र आता सामाजिक न्याय विभागाने ४१० कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग केल्याने रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाली आहे.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दोन महिन्यांच्या आत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन केलं होतं.
त्यानुसार आतापर्यंत सुमारे १ कोटी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे.
विशेष म्हणजे, ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यांनाही यावेळचा हप्ता देण्यात आला आहे.
सरकारने महिलांना दिलेली ही आगाऊ रक्कम, ‘दिवाळीपूर्व आनंदाची भेट’ म्हणून सध्या राज्यभरात चर्चेत आहे.
📰 ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा सन्मान निधी खात्यात जमा; महिलांसाठी दिवाळीची गोड भेट!
|