बातम्या

“माझी नौका गोरगरिबांच्या आशीर्वादामुळे वाचली” मंत्री हसन मुश्रीफ यांचे भावनिक उद्गार

My boat was saved due to the blessings of the poor


By nisha patil - 6/6/2025 8:57:04 PM
Share This News:



कागल (ता. ६ जून) –“अनेक कटकारस्थानांनंतरही माझी नौका गोरगरिबांच्या आशीर्वादामुळे समुद्रातून अलगद बाहेर आली,” अशा भावनिक शब्दांत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी भावना व्यक्त केल्या.

कागल येथे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ९५० लाभार्थ्यांना पेन्शन मंजुरीपत्रांचे वितरण मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमात समितीचे अध्यक्ष प्रताप उर्फ भैया माने, तहसीलदार अमरदीप वाकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

मुश्रीफ यांनी म्हटले, “गोरगरिबांसाठी मी आजन्म सेवक म्हणून काम करत राहीन. पेन्शन दीड हजारावरून दोन हजार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशांत जाधव तर आभार तहसीलदार वाकडे यांनी मानले.


“माझी नौका गोरगरिबांच्या आशीर्वादामुळे वाचली” मंत्री हसन मुश्रीफ यांचे भावनिक उद्गार
Total Views: 55