बातम्या
जळगाव जिल्ह्यातील शेतकरी चळवळीतील माझा सहकारी हरपला - आ. सदाभाऊ खोत
By nisha patil - 8/4/2025 2:58:30 PM
Share This News:
जळगाव जिल्ह्यातील शेतकरी चळवळीतील माझा सहकारी हरपला - आ. सदाभाऊ खोत
आ. सदाभाऊ खोत यांनी कुटुंबियांची सांत्वनपर घेतली भेट
जळगाव जिल्ह्यातील रयत क्रांती संघटनेचे चाळीसगाव तालुकाध्यक्ष आदरणीय अशोक पाटील त्यांचे अपघाती निधन झाले. रयत क्रांती संघटनेचे नेते आ. सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.
शेतकरी संघटनेमध्ये अशोक बाबा पाटील यांचे मोठे योगदान आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर ते कायम सातत्याने लढत असायचे. जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलो की नियोजनकरीता अशोक बाबा कायम पुढे असायचे. अशोक बाबांच्या आकस्मित जाण्याने शेतकरी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी रयत क्रांती संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष शिवनाथभाऊ जाधव, विजय पाटील, डॉ. हिम्मतराव पाटील, रोहिदास पाटील सचिन पाटील तसेच रयत क्रांती संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्यातील शेतकरी चळवळीतील माझा सहकारी हरपला - आ. सदाभाऊ खोत
|