विशेष बातम्या
विवेकानंद महाविद्यालयाच्या छात्रांना एन. सी. सी. स्कॉलरशिप
By nisha patil - 7/6/2025 3:17:23 PM
Share This News:
विवेकानंद महाविद्यालयाच्या छात्रांना एन. सी. सी. स्कॉलरशिप
कोल्हापूर : एन.सी.सी. मुख्यालय दिल्ली तर्फे 6 महाराष्ट्र गर्ल्स बटालियनच्या विवेकानंद कॉलेजच्या छात्रांना सन 2024-25 करीता एन.सी.सी. कॅडेट वेल्फेअर सोसायटी व राज्य सरकार शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. त्याबद्दल विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर.आर.कुंभार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
1) SUO रिध्दी सत्यवान रावराणे – कॅडेट वेलफेअर सोसायटी स्कॉलरशिप,
स्टेट गर्व्हमेंट स्कॉलरशिप
2) SUO साक्षी राजेंद्र बच्चे – कॅडेट वेलफेअर सोसायटी स्कॉलरशिप
3) SGT वैष्णवी विक्रम ढेंगे – कॅडेट वेलफेअर सोसायटी स्कॉलरशिप
4) L/CPL दिक्षा सुरेश लोहार – कॅडेट वेलफेअर सोसायटी स्कॉलरशिप
5) L/CPL श्रावणी कृष्णात अडसुळ – कॅडेट वेलफेअर सोसायटी स्कॉलरशिप
शिष्यवृत्ती जाहीर झाल्याबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य मा. अभयकुमार साळुंखे, सेक्रेटरी मा. प्राचार्या सौ शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, प्रबंधक श्री. एस.के.धनवडे यांनी अभिनंदन केले.
वरील छात्रांना महाराष्ट्र बटालियनचे कर्नल संधान मिश्रा, मेजर सुनिता भोसले, लेफ्टनंट जितेंद्र भरमगोंडा यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
विवेकानंद महाविद्यालयाच्या छात्रांना एन. सी. सी. स्कॉलरशिप
|