बातम्या
पूरग्रस्तांच्या मदतीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – मंत्री हसन मुश्रीफ यांचा दिलासा
By nisha patil - 9/27/2025 3:52:45 PM
Share This News:
पूरग्रस्तांच्या मदतीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – मंत्री हसन मुश्रीफ यांचा दिलासा
५१ लाखांची मदत घेऊन १२ ट्रक रवाना – उर्वरित १३ ट्रक लवकरच
कोल्हापूर, दि. २८ : मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ५१ लाख रुपयांची मदत घेऊन जीवनावश्यक वस्तूंचे २५ पैकी १२ ट्रक रवाना करण्यात आले. उर्वरित १३ ट्रकही लवकर पाठविले जाणार असल्याची माहिती मुश्रीफ यांनी दिली.
मदत किटमध्ये समावेश
या किटद्वारे २५ हजारांहून अधिक कुटुंबांपर्यंत मदत पोहोचविण्यात येणार आहे.
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले
“महापुराच्या काळात कोल्हापूर जिल्ह्याला इतर भागातून मदत मिळाली होती. आज ते संकटात आहेत, त्यामुळे आपण सामाजिक बांधिलकीतून त्यांच्यासाठी पुढे आलो पाहिजे. पूरग्रस्त कुटुंबे घरी परतल्यावर त्यांना अंथरूण–पांघरूण, भांडीकुंडी व कपडेही देण्यात येतील.”
जनावरांसाठी मदत
पूरामुळे चाऱ्याची टंचाई निर्माण झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जवळच्या जिल्ह्यांतून वैरण तसेच गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून पशुखाद्य व टी.एम.आर. भुकटी पाठविण्यात येणार आहे.
आवाहन
“दानशूर व्यक्ती, उद्योगपती, संस्था व संघटनांनीही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे यावे,” असे आवाहन मुश्रीफ यांनी केले.
या वेळी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील–आसुर्लेकर, प्रताप उर्फ भैय्या माने, राहुल पाटील, आदिल फरास, शिवाजीराव पाटील, सूर्यकांत पाटील, भरत पाटील–भुयेकर, किसन चौगुले, असिफ फरास, विकास पाटील–कुरुकलीकर, नितीन दिंडे, प्रवीणसिंह भोसले, युवराज पाटील, अमित गाताडे, सुहास जांभळे आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
पूरग्रस्तांच्या मदतीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – मंत्री हसन मुश्रीफ यांचा दिलासा
|