राजकीय

गडहिंग्लज नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचा दणदणीत विजय

NCP wins resounding victory in Gadhinglaj Municipal Council elections


By nisha patil - 12/21/2025 11:55:35 AM
Share This News:



गडहिंग्लज :- गडहिंग्लज नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा विजय मिळवत नगराध्यक्षपदावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराने तब्बल चार हजार मतांच्या फरकाने विजय संपादन केला आहे.

नगरपरिषद निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसला एकूण 17 जागा मिळाल्या असून महायुतीला केवळ 5 जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निकालामुळे शहराच्या राजकारणात राष्ट्रवादीचे वर्चस्व पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

निवडणूक निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहरात जल्लोष करत फटाके फोडून आनंद व्यक्त केला. विजयी उमेदवारांचे समर्थक, पदाधिकारी आणि नागरिकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.

या विजयामुळे आगामी काळात गडहिंग्लज नगरपरिषदेच्या माध्यमातून विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. तर पराभवामुळे महायुतीकडून आत्मपरीक्षण सुरू असल्याचे चित्र आहे.


गडहिंग्लज नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचा दणदणीत विजय
Total Views: 116