राजकीय

आजरा तालुका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळाचे वर्चस्व

NCPs watch dominates Ajra Taluka Zilla Parishad and Panchayat Samiti


By nisha patil - 10/2/2026 11:15:35 AM
Share This News:



आजरा तालुका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळाचे वर्चस्व

आजरा (हसन तकीलदार) :- आजरा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी सोमवारी झाली. यामध्ये जिल्हापरिषद उत्तूर गटातून राष्ट्रवादीचे शिरीष देसाई तर पेरणोली गटातून राष्ट्रवादीचेच सुधीरभाऊ देसाई यांनी विजयाची पताका फडकवली.पंचायत समिती उत्तुर गणातून राष्ट्रवादीचे विकास चोथे, भादवण गणातून राष्ट्रवादीच्या जयश्री गाडे, पेरणोली गणातून राष्ट्रवादी-शिवसेना ठाकरे गट पुरस्कृत यशोदा पोवार, वाटंगी गणातून भाजपचे समीर पारदे विजयी झाले. आजरा पंचायत समितीवर राष्ट्रवादी पक्ष सत्ता स्थापन करणार आहे. भादवण गणातून विजयी झालेल्या जयश्री गाडे या सभापती पदावर विराजमान होणार आहेत.


पंचायत समिती उत्तूर मतदारसंघ :
अभिजीत अमृत आरेकर (उत्तूर), काँग्रेस : 455
संभाजी राजाराम कुराडे (उत्तूर), शिवसेना शिंदे गट : 4669
विकास वसंत चोथे (बहिरेवाडी), राष्ट्रवादी अजित पवार गट : 7281 (विजयी)
सागर शशिकांत वाघरे (होन्याळी), शिवसेना ठाकरे गट : 285
महेश काशिनाथ करंबळी (उत्तूर), ताराराणी आघाडी पक्ष : 4809


पंचायत समिती भादवण मतदार संघ :
जयश्री गजानन गाडे (भादवण), राष्ट्रवादी अजित पवार गट : 6153 (विजयी)
भारती कृष्णा डेळेकर (सोहाळे), शिवसेना शिंदे गट : 4904
साधना संजय केसरकर (भादवण), ताराराणी आघाडी पक्ष : 3788
नोटा : 128


पंचायत समिती पेरणोली मतदारसंघ :
स्मिता उत्तम देसाई (पेरणोली), भारतीय जनता पार्टी : 3737
श्वेता रणजीतकुमार सरदेसाई (लाटगाव), शिवसेना शिंदे गट : 4126
अस्मिता दत्तात्रय कांबळे (कोरीवडे), वंचित बहुजन आघाडी : 446
जिजाबाई महादेव कांबळे (कासार कांडगाव), अपक्ष : 81
यशोदा युवराज पोवार (देऊळवाडी), अपक्ष : 6542 (विजयी)
नोटा : 166


पंचायत समिती वाटंगी मतदारसंघ :
समीर दशरथ पारदे (मलिग्रे), भारतीय जनता पार्टी : 6226 (विजयी)
सतीश गणपती फडके (सुळे), शिवसेना शिंदे गट : 2572
राजाराम गुणाजी होलम (पोळगाव), राष्ट्रवादी अजित पवार गट : 5263
किरण विश्वनाथ कोरे (बुरुडे), अपक्ष : 30
नरसू बाबू शिंदे (पोश्रातवाडी), अपक्ष : 235
नोटा : 82


जिल्हा परिषद उत्तूर मतदारसंघ :
विठ्ठल महादेव उत्तूरकर (उत्तूर), शिवसेना शिंदे गट : 9443
शिरीष हिंदुराव देसाई (उत्तूर), राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट : 12801 (विजयी)
उमेश मुकुंदराव आपटे (उत्तूर), ताराराणी आघाडी पक्ष : 10202
नोटा : 191


जिल्हा परिषद पेरणोली मतदारसंघ :
विष्णू मोतबा केसरकर (किणे), शिवसेना शिंदे गट : 6368
सुधीर राजाराम देसाई (वेळवट्टी), राष्ट्रवादी अजित पवार गट : 12042
जयवंत मसणू सुतार (किणे), भारतीय जनता पार्टी : 10613
सुधीर रामदास सुपल (लाटगाव), राष्ट्रीय समाज पक्ष : 294
सुरेश कृष्णा शिंगटे (वाटंगी), अपक्ष : 117
नोटा : 76


आजरा तालुका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळाचे वर्चस्व
Total Views: 185