बातम्या
‘गोकुळ’च्या शेतकरीहित दृष्टिकोनाचे एन.डी.डी.बी.कडून कौतुक
By nisha patil - 7/31/2025 9:55:48 PM
Share This News:
‘गोकुळ’च्या शेतकरीहित दृष्टिकोनाचे एन.डी.डी.बी.कडून कौतुक
गोकुळ-एन.डी.डी.बी. सहकार्य आणखी बळकट होणार – डॉ. मिनेश शहा
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) चे चेअरमन नविद मुश्रीफ व संचालक मंडळाने ३० जुलै रोजी गुजरातमधील नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (एन.डी.डी.बी.), आणंद येथे विविध प्रकल्पांना अभ्यासपूर्वक भेट दिली. यावेळी ‘गोकुळ’ दूध संघ व एन.डी.डी.बी. यांच्यात शेतकरीहिताच्या विविध उपक्रमांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
एन.डी.डी.बी.चे चेअरमन डॉ. मिनेश शहा यांनी गोकुळच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत, “गोकुळ संघ आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारणारा आदर्श सहकारी दूध संघ आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवण्यात गोकुळची भूमिका महत्त्वपूर्ण आहे,” असे नमूद केले. त्यांनी गोकुळला भविष्यात अधिक व्यापक व प्रभावी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
या भेटीत वासरू संगोपन, IVF प्रकल्प, TMR (चारवीट), जैविक खत, जनोमिक्स प्रयोगशाळा यांसह विविध उपक्रमांची माहिती घेतली. याशिवाय अमूल संघातील प्राथमिक दूध संस्थांचा कार्यपद्धतीचा अभ्यासही करण्यात आला.
‘गोकुळ’च्या शेतकरीहित दृष्टिकोनाचे एन.डी.डी.बी.कडून कौतुक
|