बातम्या
एनएचएम कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सरकार पातळीवर पाठपुरावा – आमदार सतेज पाटील
By nisha patil - 10/9/2025 5:46:32 PM
Share This News:
एनएचएम कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सरकार पातळीवर पाठपुरावा – आमदार सतेज पाटील
आश्वासनानंतर राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर राज्य सरकारकडून सकारात्मक तोडगा काढला जाईल, यासाठी मी सरकार पातळीवर पाठपुरावा करणार आहे, अशी ग्वाही विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली.
बेमुदत आंदोलनाच्या १६व्या दिवशी बुधवारी आमदार पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान, मंत्रालयातील चर्चेत सरकारने मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्याने सायंकाळी हे आंदोलन मागे घेण्यात आले.
एनएचएम कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सरकार पातळीवर पाठपुरावा – आमदार सतेज पाटील
|