ताज्या बातम्या
एनआयएने पहलगाम आतंकवादी हल्ला प्रकरणात 1,597 पानांची चार्जशीट दाखल केली
By nisha patil - 12/16/2025 1:20:03 PM
Share This News:
राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ने जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याप्रकरणी 1,597 पानांची सविस्तर चार्जशीट विशेष NIA न्यायालयात दाखल केली आहे.
या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता. तपासात हा हल्ला पाकिस्तानातून रचण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून, पाकिस्तानस्थित दहशतवादी हँडलर साजिद जट्टसह सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये बंदी घालण्यात आलेल्या लष्कर-ए-तोयबा (LeT) आणि त्याचा प्रॉक्सी संघटना द रेसिस्टन्स फ्रंट (TRF) यांचाही समावेश आहे.
हल्ल्यात प्रत्यक्ष सहभागी असलेले तीन दहशतवादी नंतर सुरक्षा दलांनी चकमकीत ठार केले असून, दोन स्थानिक आरोपींनी त्यांना आश्रय व मदत दिल्याचे पुरावे चार्जशीटमध्ये नमूद आहेत. आरोपींवर UAPA, भारतीय न्याय संहिता व आर्म्स अॅक्टअंतर्गत तसेच भारताविरोधात युद्ध छेडल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
एनआयएने पहलगाम आतंकवादी हल्ला प्रकरणात 1,597 पानांची चार्जशीट दाखल केली
|