बातम्या
‘विवेकानंद’ मध्ये एन.एस.एस.चे उद्घाटन
By nisha patil - 9/13/2025 5:08:10 PM
Share This News:
‘विवेकानंद’ मध्ये एन.एस.एस.चे उद्घाटन
कोल्हापूर : राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी विद्यार्थ्यांनी सेवाभाव व बंधूभाव समोर ठेवून कार्य करावे. स्वत:मध्ये नेतृत्वगुण विकसीत करावेत. स्वामी विवेकानंदांचे आचार व विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत व आपल्या देशाची अधिक विकास करावा. राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी झाल्याने विद्यार्थ्याच्या सर्वांगिण विकासाला चालना मिळते. समाजसेवा म्हणजे फक्त् श्रमदान नसून सर्वगुणसंपन्न् बनण्याची संधी आहे. एन.एस.एस. च्या माध्यमातून मानसिक, बौध्दिक, सामाजिक विकास होतो. माणूस घडविण्यासाठी आजच्या युगामध्ये रा.से.योजना अत्यंत महत्वाची आहे. कारण ती सशक्त जीवनाचे शिक्षण देते. असे प्रतिपादन विवेकानंद केंद्राचे संचालक मा. अरुण कुलकर्णी यांनी केले. ते विवेकानंद कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्घाटन प्रसंगी व विश्वबंधूता दिना निमित बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार हे होते. येथील विवेकानंद कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील राष्ट्रीय सेवा योजनेचे उदघाटन मा.अरुण कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न् झाले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार म्हणाले, महाविद्यालयाचे काम करत समाजापर्यंत पोहोचण्यासाठी रा.से.योजनेचे कार्य उपयोगी पडते. एन.एस.एस. च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त निर्माण् होते. माणसाला माणसाशी माणसा सारखे जगायला एन.एस.एस. शिकवते श्रमाची प्रतिष्ठा जपल्यामुळे शिस्त, स्वावलंबन इत्यादीमुळे बलवान राष्ट्राची निर्मिती युवा शक्तीद्वारे केली जाते. तसेच जाती धर्म, भेदभाव न मानता आम्ही भारतीय एक आहोत ही ऐक्याची भावना निर्माण होते, असे मत मांडले. या कार्यक्रमामध्ये पार्थ जाधव आणि श्वेता पाटील या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते मांडली.
कार्यक्रमाची सुरुवात रोपास पाणी घालून व शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थनेने झाली. समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.बी.टी.दांगट यानी केले, डॉ.जी.एस.उबाळे प्रा. हेमंत पाटील यांनी आभार मानले. प्रा. डॉ.संपदा टिपकुर्ले यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास डॉ संदीप पाटील, प्रा.प्रविण बागडे, डॉ. राजश्री पाटील, डॉ.जी.एस.उबाळे व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘विवेकानंद’ मध्ये एन.एस.एस.चे उद्घाटन
|