बातम्या
*नगरपंचायतीने दररोज पाणी पुरवठा करावा-नगरसेवक परशुराम बामणे
By Administrator - 4/7/2026 11:42:02 PM
Share This News:
*नगरपंचायतीने दररोज पाणी पुरवठा करावा-नगरसेवक परशुराम बामणे
*आजरा(हसन तकीलदार):- जवळ जवळ एक महिना पाऊस उशिरा सुरु झाल्याने जूनचा पूर्ण महिना कोरडा गेला होता. सर्वजण पावसासाठी साकडे घालत होते. पावसासाठी प्रार्थना, दुआ सुरु होती. चित्री प्रकल्पामध्ये केवळ 12%पाणी साठा होता व चित्रा नदीचे पात्र कोरडे ठणठणीत पडल्याने आजरा शहराला पाणी पुरवठा करणे अवघड झाले होते. त्यामुळे नगरपंचायतीने एक दिवस आड पाणी सोडण्याचे धोरण अवलंबले होते. मागील एक महिन्यापासून एक दिवस आड पाणी पुरवठा सुरु आहे.पावसाची सुरवात चांगली होऊन नदीपात्रात पाणी वाढल्याने दररोज पाणी सोडण्याची मागणी नगरसेवक परशुराम बामणे यांनी केली आहे.
जूनचा महिना कोरडा गेला परंतु जुलै च्या पहिल्या तारखेपासूनच पावसाने आपली संततधार बॅटिंग सुरु केल्याने चित्रा नदी आता दुथडी भरून वाहत आहे. नदीपात्रात आता समाधानकारक पाणी दिसून येत आहे. त्यामुळे आता आजरावासियांना एक दिवस आड पाणी न सोडता दररोज पाणी सोडण्यात यावे अशी मागणी नगरसेवक परशुराम बामणे(भाऊजी)यांनी नगरपंचायत प्रशासनाकडे केली आहे. यावेळी ते स्वतः चित्री नदीवर ज्या ठिकाणी पाण्याचे जॅकवेल आहे तेथे भर पावसात जाऊन पाहणी केली आणि त्याचे चित्रीकरण केले. नदीतील पाणी समाधानकारक असून आता दररोज पाणी सोडण्यासाठी काहीही हरकत नसल्याचे त्यांनी सांगितले. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना तसेच मुख्याधिकाऱ्यांना दररोज पाणी सोडण्याबाबत सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले.
*नगरपंचायतीने दररोज पाणी पुरवठा करावा-नगरसेवक परशुराम बामणे
|