बातम्या
नगरसेविका प्राध्यापिका पूनम लिचम यांच्या प्रयत्नांना यश
By nisha patil - 6/21/2026 2:55:47 PM
Share This News:
नगरसेविका प्राध्यापिका पूनम लिचम यांच्या प्रयत्नांना यश
गांधीनगर जवळील नागझरी रस्ता उजळला*
आजरा(हसन तकीलदार)*:-प्रभाग क्र. 17 मधील नागझरी येथे रस्त्यावरील दिवे बंद असल्यामुळे नागरिकांना व वाटसरुना या रस्त्यावरून येणे जाणे अवघड झाले होते. रात्रीच्यावेळी मार्गक्रमण करताना अनेक अडचणीना सामोरे जावे लागत होते.
अंदाजे गेल्या पाच वर्षापासून या ठिकाणी रस्त्यावरचे दिवे बंद असल्याचे सांगण्यात आले. परंतु नगरसेविका प्रा. पूनम लिचम यांनी याचा पाठपुरावा करून अखेर नागझरी रस्त्यावरील पथदिवे सुरु केले.
खडकावर वस्ती असलेले ख्रिश्चन बांधव व पारपोलकर कॉलनी यांची नागझरी रस्त्यावर दिवे सुरु करण्याची मागणी होती. परंतु गेली पाच वर्षे येथे दिवे लावले जात नसल्याची तक्रार पुढे आली. आणि नगरसेविका प्रा. पूनम लिचम यांनी याबाबत गेली दोन महिने सतत पाठपुरावा केला. वारंवार त्यांनी नगरपंचायतीच्या विद्युत विभागाच्या कदम मॅडम यांना रस्त्यावर दिवे नसल्यामुळे नागरिकांना येणारे अडथळे निदर्शनास आणून दिले.
कदम मॅडम यांनी विद्युत विभागाकडून आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करून कामाचे नियोजन केले. व नगरपंचायतीचे वायरमन किसन सुतार व विजविभागचे वायरमन रमेश कांबळे यांचेकडून लवकरात लवकर काम पूर्ण करण्यासाठी सांगण्यात आले. भूमिगत केबल टाकून जवळपास आठ बल्ब जोडून रस्त्यावर उजेडाची सोय करण्यात आली. याकामी नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांचेही सहकार्य लाभले असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी मारिया डिसुझा, गोपाळ यादव, स्टीफन डिसुझा, अमोल जाधव यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
नगरसेविका प्राध्यापिका पूनम लिचम यांच्या प्रयत्नांना यश
|