बातम्या
स्वातंत्र्यवीर सावरकर चौक नामकरण व अखिल भारत हिंदू महासभा शाखा उद्घाटन समारंभ.
By nisha patil - 5/29/2025 9:03:11 PM
Share This News:
स्वातंत्र्यवीर सावरकर चौक नामकरण व अखिल भारत हिंदू महासभा शाखा उद्घाटन समारंभ.
कोल्हापूर. (प्रतिनिधी)अखिल भारत हिंदू महासंघ तर्फे आज स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त गेली 40 वर्षांपूर्वी नियोजित आणि प्रस्थापित असणारा स्वातंत्र्यवीर सावरकर चौकास नव उजाळा आणि नवीन पिढीला माहीत होईल असे स्वातंत्र्य वीर सावरकर चौक आणि अखिल भारत हिंदू महासभे च्या शाखेचे उद्घाटन असा भव्य दिव्य कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नामदार महाराष्ट्र राज्य आर्थिक नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर दादा वाघापूरकर होते. स्वागत अध्यक्ष नगरसेवक अजित ठाणेकर सचिन भाऊ बिरंजे विजय सरदार साळोखे किशोर घाटगे मनोहर सोरप संजय कुलकर्णी योगेश पवार आदी होते
या कार्यक्रमाची सूत्रसंचालन आ भारत हिंदू महासभा जिल्हाध्यक्ष संदीप सासने महिला अध्यक्ष स्वातीताई रजपूत पत्रकार मालोजी केरकर विनोद चोपडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सौ शोभाताई शेलार पाटील यांनी केले होते. प्रारंभी आज सायंकाळी पाच वाजता सरस्वती टॉकीज समोर ताराबाई रोड या चौकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले
बुधवार 28 मे 2025 रोजी नाम फलकाचे मान्यवरांच्या हस्ते फलक अनावरण झाले सौ रेणू पोवार सौ सुवर्णा सुतार गजानन तोडकर बापू पाटील विकास जाधव आशिष लोखंडे अजित जमदाडे जितेंद्र चव्हाण अभिजीत पाटील संग्राम जरग सुनील सामंत तसेच सर्व सकल हिंदू समाज संघटना व हिंदुत्ववादी संघटना चे कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते
स्वातंत्र्यवीर सावरकर चौक नामकरण व अखिल भारत हिंदू महासभा शाखा उद्घाटन समारंभ.
|