विशेष बातम्या
नांदणी महादेवी हत्ती वाद: आमदार सतेज पाटील मठाच्या भेटीवर, राष्ट्रपतींना लाखो सह्यांचे निवेदन
By nisha patil - 7/31/2025 9:49:33 PM
Share This News:
नांदणी महादेवी हत्ती वाद: आमदार सतेज पाटील मठाच्या भेटीवर, राष्ट्रपतींना लाखो सह्यांचे निवेदन
शिरोळ (ता. ३१ जुलै) – नांदणी येथील महादेवी हत्तीनीला गुजरातच्या वनतारा येथे पाठवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठाला भेट दिली.
हत्ती पाठवण्याच्या निर्णयावर त्यांनी संशय व्यक्त केला असून, "ही घटना भावनांना दुखावणारी असून यात राजकारण नको, मात्र राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा," अशी मागणी त्यांनी केली.
महादेवीला परत आणण्यासाठी लाखो सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींना पाठवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार राजूबाबा आवळे, जैन समुदायाचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नांदणी महादेवी हत्ती वाद: आमदार सतेज पाटील मठाच्या भेटीवर, राष्ट्रपतींना लाखो सह्यांचे निवेदन
|