बातम्या

महादेवी साठी सुरु असलेल्या लढ्याला कोल्हापूरच्या मुस्लिम समाजाचा पाठिंबा

Nandni mahadevi elephant


By nisha patil - 3/8/2025 10:19:29 PM
Share This News:



महादेवी साठी सुरु असलेल्या लढ्याला कोल्हापूरच्या मुस्लिम समाजाचा पाठिंबा

कोल्हापूर  – नांदणी येथील जैन मठाच्या हत्तीणी महादेवी हिला परत आणण्यासाठी सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटकात मोठा लढा सुरु आहे. ही हत्तीण केवळ एका धर्माची नाही, तर कोल्हापूरच्या धार्मिक, सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक मानली जात आहे.

त्यामुळे मुस्लिम समाजाच्या वतीने  या लढ्याला आपला लढा मानत पाठिंबा देत असल्याचे मोहामेडन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गणी आजरेकर यांनी सांगितले.

 "कोल्हापूर हे धार्मिक सहिष्णुतेचे आणि सर्वधर्मसमभावाचे प्रतीक आहे. या भूमीवर कोणत्याही धार्मिक वारशाला धक्का लागेल, हे आम्हाला मान्य नाही. माधुरीसाठी सुरू असलेल्या या लढ्यात आम्ही पूर्ण ताकदीने सहभागी होणार आहोत. ही लढाई केवळ एका प्राण्यासाठी नाही, तर कोल्हापूरच्या धार्मिक एकतेसाठी आहे.यासाठी उद्याच्या मोर्चात मुस्लिम समाज मोठ्या संख्येने सहभागी होईल." नांदणी ते कोल्हापूर ही पदयात्रा रविवारी दुपारी चार वाजता कोल्हापूर शहरात तावडे हॉटेलजवळ पोहोचणार आहे. या पदयात्रेत मोठ्या संख्येने मुस्लिम समाजाने सहभागी व्हावे असे आवाहनही गणी आजरेकर यांनी केले आहे.


महादेवी साठी सुरु असलेल्या लढ्याला कोल्हापूरच्या मुस्लिम समाजाचा पाठिंबा
Total Views: 118