बातम्या
डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे गणेश चतुर्थी आणि गौरी विसर्जननिमित्त निर्माल्य संकलन व्यवस्थापन उपक्रम यशस्वीरित्या संपन्न
By nisha patil - 9/20/2026 3:45:49 PM
Share This News:
*डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे गणेश चतुर्थी आणि गौरी विसर्जननिमित्त निर्माल्य संकलन व्यवस्थापन उपक्रम यशस्वीरित्या संपन्न**
**आजरा(हसन तकीलदार)*:- डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे पदमश्री डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भूषण डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश चतुर्थी तसेच गौरी विसर्जन निमित्त बेळगांव, संकेश्वर, निपाणी, गडहिंग्लज, आणि आजरा येथे निमार्ल्य व्यवस्थापन उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. ह्या उपक्रमासाठी निपाणी,संकेश्वर ,गडहिंग्लज,
आजरा बेळगाव
भागातील श्रीसदस्यांनी सह्भाग घेतला .
एकूण 300 श्रीसदस्यांनी सकाळी 11:00 ते रात्री 11:00 या वेळेत निमार्ल्य व्यवस्थापन केले. एकूण 5 शहरात 8 ठिकाणी हे निर्माल्य संकलनाचे सेवाभावी कार्य यशस्वीरित्या संपन्न झाले .
ह्या सर्व निर्माल्याचे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या मार्गदर्शनाखाली खत तयार केले जाते. ह्या सर्व खताचा उपयोग डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्र व कर्नाटका राज्यामध्ये वृक्ष लागवड केलेल्या ठिकाणी उपयोग केला जातो.
महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी, - एक महान समाजसुधारक- यांना त्यांच्या पूर्वजांकडून सामाजिक
प्रबोधनाचा वारसा लाभला. मानवी अस्तित्वाच्या प्रत्येक स्तरावर समाजातून अज्ञान नष्ट करण्याच्या कार्यासाठी त्यांनी
स्वतःला झोकून दिले. 8 ऑक्टोबर 1943, विजयादशमी, रोजी त्यांनी सामाजिक प्रबोधनाचा पाया रचण्यास सुरुवात केली.
पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मरणार्थ 2010 मध्ये डॉ.
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान स्थापन केले. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य सुरु आहे.त्यांनी प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक प्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, वृक्षारोपण आणि त्यांचे संगोपन, भूजल पुनर्भरण, रक्तदान, आरोग्य जागृती शिबिरे, निर्माल्य संकलन आणि कंपोस्टिंग, प्रौढ साक्षरता, पुरानंतरच्या स्वच्छतेसाठी स्वयंसेवा केले जात आहे.
त्यांच्या सामाजिक कार्यासाठी पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘द लिव्हिंग लिजेंड’तर डॉ.सचिन धर्माधिकारी यांना युरोपियन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट, पॅरिसतर्फे ‘द ग्लोबल लीडर’ही पदवी प्रदान करण्यात आली आहे.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे सामजिक प्रबोधन सोबत आज सामजिक कर्त्याव्याबदल मार्गदर्शन दिले जाते ज्यामध्ये देश मला काय देतो यापेक्षा मी देशाला काय देतो हि जाणीव प्रत्येक श्रीसदस्यांना मिळत असल्यामुळे प्रत्येक श्रीसदस्य आपले कर्तव्य म्हणून समाजिक उपक्रमामध्ये सहभागी होत असून सर्व उपक्रम यशस्वीरित्या संपन्न होत आहे.
एका वाक्यात डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कार्याबद्दल सांगायचे झाले तर
"Where there is need for the society we are working in that field" "ज्या क्षेत्रात समाजाला गरज आहे त्या क्षेत्रात डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान कार्य चालू आहे ".
आजऱ्यातील नियोजनाची जबाबदारी दयानंद भोपळे यांनी पार पाडली.यावेळी आजरा नगरपंचायतीचे आरोग्य अधिकारी अमर कांबळे यांनी भेट देऊन कार्याचे कौतुक केले.
डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे गणेश चतुर्थी आणि गौरी विसर्जननिमित्त निर्माल्य संकलन व्यवस्थापन उपक्रम यशस्वीरित्या संपन्न
|