बातम्या

भुदरगड तालुक्यातील पडखंबेच्या नानुबाईंना आदर्श माता पुरस्कार

Nanubai of Padkhambe


By nisha patil - 11/18/2025 5:18:15 PM
Share This News:



भुदरगड तालुक्यातील पडखंबेच्या नानुबाईंना आदर्श माता पुरस्कार
 

आजरा(हसन तकीलदार):-भुदरगड तालुक्यातील तिरवडे येथे नांदेकर कुटुंबियांच्यावतीने स्व.आनंदीबाई नांदेकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त "आदर्श माता "पुरस्कार वितरण व कीर्तन सोहळ्यात पडखंबेच्या सौ.नानुबाई कांबळे यांना आदर्श माता पुरस्कार देण्यात आला. आजरा भुदरगडचे लाडके नेते तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालक मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
           

मातृत्व, कर्तृत्व आणि निस्वार्थी प्रेमाचे मूर्तिमंत रूप म्हणजे आई, कुटुंबाला प्रेमाने एकत्र बांधून ठेवणारे मायेचे बंध म्हणजे आई, घराचं घरपण जपणारी ती आई, आपली मुलं यशाच्या शिखरावर पोहचवण्यासाठी हाडाचा काडा करणारी म्हणजे आई... म्हणूनच अशा मातृत्वाचा सन्मान करण्याची जबाबदारी ही समाजाची असते आणि ही जबाबदारी भुदरगडच्या बाबा नांदेकर ग्रुप फाउंडेशनने स्वीकारली आहे. आई वडिलांचे लहानपणीच छत्र हरवलेल्या पोरक्या पतीच्या खांद्याला खांदा लावून नानुबाई यांनी प्रपंचाचा गाडा हाकत शेतात काबाड कष्ट करून काजूच्या झाडांची रखवाली करून त्यातून मिळणाऱ्या पैशातून मुलांच्या शिक्षणाची गरज भागवत मुला मुलींना यशाच्या शिखरावर पोहचवण्याचे काम नानुबाई यांनी केले. मुलगा संजय सिव्हिल इंजिनियर होऊन सौदी अरेबीयात उच्च पदावर काम करत आहे तर दोन्ही नाती कायद्याचा अभ्यास करून पत्रकारितेचा अमेरिकेतील कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत.

स्वतः अशिक्षित असूनही मुला मुलींना उच्चशिक्षित करण्यासाठी उन,वारा, पाऊस याची तमा न बाळगता कष्ट करीत मुलांचं भाविष्य उज्वल केल्याबद्दल तसेच चांगले संस्कार दिल्याबद्दल नाम. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आदर्श माता पुरस्कार देण्यात आला.
   

मातृत्वाची जाणीव असणारेच समाजाचे दुःख दूर करू शकतात. नांदेकर कुटुंबाने आदर्श माता पुरस्कार प्रदान करून मातृत्वाचा गौरव केला असल्यानेच कीर्तन सोहळ्यास अध्यात्मिक उंची प्राप्त झाली आहे. असे नाम. आबिटकर यांनी गौरवॊदगार काढले. हभ.प.चैतन्य महाराज वाडेकर यांचे कीर्तन झाले. यावेळी नंदकुमार ढेंगे, दत्तात्रय उगले, बाबा नांदेकर, सारिका नांदेकर, कल्याणराव निकम, मदनदादा देसाई, संदीप वरंडेकर, शहाजी देसाई, मानसिंग पाटील आदिजण उपस्थित होते.


भुदरगड तालुक्यातील पडखंबेच्या नानुबाईंना आदर्श माता पुरस्कार
Total Views: 418