बातम्या
दूध उत्पादन वाढीसाठी राष्ट्रीय दूध मोजणी कार्यक्रम महत्त्वाचा – अरुण डोंगळे
By nisha patil - 5/19/2025 9:23:16 PM
Share This News:
दूध उत्पादन वाढीसाठी राष्ट्रीय दूध मोजणी कार्यक्रम महत्त्वाचा – अरुण डोंगळे
कोल्हापूर: गोकुळ दूध संघामार्फत राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय दूध मोजणी कार्यक्रमाअंतर्गत मिल्क रेकॉर्डर स्वयंसेवकांना स्मार्ट वजन काटे व साहित्याचे वाटप करण्यात आले.
गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते ताराबाई पार्क कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी डोंगळे म्हणाले की, या उपक्रमामुळे उच्च वंशावळीच्या जनावरांची निवड, दूधाची गुणवत्ता तपासणी व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे शक्य होईल. कोल्हापूर जिल्ह्यातील ३२४० जनावरांची नोंदणी करून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
कार्यक्रमासाठी ४५ दूध तपासणी केंद्रे स्थापन करण्यात आली असून, प्रत्येक ठिकाणी आर.बी.पी. स्वयंसेवक दूध तपासणी करणार आहेत. ब्लूटूथ तंत्रज्ञानाद्वारे दूधाचे वजन थेट भारत पशुधन अॅपमध्ये नोंदवले जाणार आहे.
कार्यक्रमाला संचालक, अधिकारी, व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दूध उत्पादन वाढीसाठी राष्ट्रीय दूध मोजणी कार्यक्रम महत्त्वाचा – अरुण डोंगळे
|