खेळ

राष्ट्रीय रोपस्किपिंग स्पर्धेत श्रेयस रानभरेची चमकदार कामगिरी | नेपाळ आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

National Ropeskipping Championship


By nisha patil - 11/12/2025 12:20:25 PM
Share This News:



तेलंगणा, हैदराबाद येथे झालेल्या इ. ६ वीच्या श्रेयसने डबल टच स्पीड प्रकारात तृतीय क्रमांक मिळवत ब्रॉन्झ पदक पटकावले आहे.

त्यामुळेच त्याची नेपाळ येथे २१ ते २३ जानेवारी २०२६ ला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

आश्रम शाळेतून प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणारा विद्यार्थी म्हणून श्रेयसने संपूर्ण संस्थेचे नाव सातासमुद्रापार पोहोचवले आहे.

या यशामागे सहाय्यक संचालिका सुनीता नेर्लेकर, अधिकारी अमित घवले, संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब सावगावे, सचिव सौ. माधुरी सावगावे, मुख्याध्यापक बाबासाहेब तिबिले, क्रीडा शिक्षक शिवराज सुनगार आणि सर्व शिक्षक–शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन आहे.

श्रेयसचे हार्दिक अभिनंदन… आणि पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!


राष्ट्रीय रोपस्किपिंग स्पर्धेत श्रेयस रानभरेची चमकदार कामगिरी | नेपाळ आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
Total Views: 31