बातम्या
इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार : इतिहास लेखन, संशोधन आणि योगदान या विषयावर शहाजी महाविद्यालयात शनिवारी राष्ट्रीय परिसंवाद
By nisha patil - 1/10/2026 2:50:09 PM
Share This News:
इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार : इतिहास लेखन, संशोधन आणि योगदान या विषयावर शहाजी महाविद्यालयात शनिवारी राष्ट्रीय परिसंवाद
कोल्हापूर : ज्येष्ठ इतिहास संशोधक, इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार : इतिहास लेखन, संशोधन आणि योगदान या विषयावर श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे . या परिसंवादाचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांचे हस्ते व श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे .
यावेळी प्राचार्य डॉ.डी.आर.मोरे,श्री राहुल पाटील, श्री राजेश पाटील, श्री इंद्रजीत बोंद्रे, श्रीमती वसुधा जयसिंगराव पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
पहिल्या सत्रामध्ये प्रा. डॉ.अवनीश पाटील यांचे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहास लेखनातील जयसिंगराव पवार यांचे योगदान या विषयावर व प्राचार्य डॉ.आर के शानेदिवाण यांचे पंचगंगेच्या तीरावरून, काळाचा पट मांडणारा दस्तऐवज या विषयावर व्याख्याने होणार आहेत. या सत्राचे अध्यक्षस्थान भरतभूषण माळी हे भूषवणार आहेत.
दुसऱ्या सत्रामध्ये डॉ. सुरेश शिखरे यांचे डॉ.जयसिंगराव पवार यांची इतिहास लेखन पद्धती : विशेष संदर्भ सेनापती संताजी घोरपडे यांचे चरित्र या विषयावर व डॉ. मंजुश्री पवार यांचे इतिहास संशोधक माझे वडील या विषयावर व्याख्याने होणार आहेत. या सत्राचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ.
इस्माईल पठाण हे भूषवणार आहेत.
ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. जे.के.पवार यांच्या उपस्थितीत या परिसंवादाचा समारोप होणार आहे.
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात या परिसंवादाचे उद्घाटन होणार आहे. महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि इतिहास विभाग यांच्या वतीने हा परिसंवाद होत आहे.
इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार : इतिहास लेखन, संशोधन आणि योगदान या विषयावर शहाजी महाविद्यालयात शनिवारी राष्ट्रीय परिसंवाद
|