बातम्या
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला राष्ट्रीय “स्पेशल कॅटेगरी कन्सिस्टन्सी परफॉर्मन्स” पुरस्कार
By nisha patil - 4/19/2025 11:24:41 PM
Share This News:
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला राष्ट्रीय “स्पेशल कॅटेगरी कन्सिस्टन्सी परफॉर्मन्स” पुरस्कार
बेलेवाडी काळम्मा | सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला पुण्यात झालेल्या नॅशनल को-जनरेशन अवॉर्ड वितरण समारंभात “स्पेशल कॅटेगरी कन्सिस्टन्सी परफॉर्मन्स अवॉर्ड” हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ आणि जी.एम. संजय घाटगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, संयोजक संजय खटाळ, जयप्रकाश दांडेगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमात बी. ए. पाटील यांना "बेस्ट इलेक्ट्रिक मॅनेजर" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी हा सन्मान सर्व संचालक, शेतकरी, इंजिनिअर्स, को-जन स्टाफ आणि तांत्रिक विभागाच्या सामूहिक मेहनतीचे फळ असल्याचे सांगितले.
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला राष्ट्रीय “स्पेशल कॅटेगरी कन्सिस्टन्सी परफॉर्मन्स” पुरस्कार
|