विशेष बातम्या
विवेकानंद महाविद्यालयात राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह 2025 साजरा
By nisha patil - 8/10/2025 4:04:25 PM
Share This News:
विवेकानंद महाविद्यालयात राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह 2025 साजरा
कोल्हापूर : विवेकानंद महाविद्यायाचा प्राणीशास्त्र विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह २०२५ दिनांक 1 ते 4 ऑक्टोबर 2025 दरम्यान उत्साहात साजरा करण्यात आला.
या वर्षीच्या वन्यजीव सप्ताहाची थीम होती - Wildlife Conservation Finance: Investing in People and Planet, ज्याद्वारे वन्यजीव संवर्धनासाठी आर्थिक गुंतवणुकीचे महत्त्व आणि निसर्ग व मानव यांच्यातील संतुलन राखण्याचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या हस्ते झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत कार्यक्रमासाठी आवश्यक सहकार्य व मार्गदर्शन केले. या सप्ताहात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले ज्यात रांगोळी, प्राणी छायाचित्रण, क्राफ्ट मॉडेल, पोस्टर प्रेझेटेशन, फेस अॅड हॅन्ड पैंटिंग, प्रश्नमंजुषा, लघुचित्र अशा स्पर्धा यांचा समावेश होता.
समारोप प्रसंगी Ecoensa, पुणे येथील पर्यावरण सल्लागार डॉ. श्रुती कुलकर्णी यांचे प्रेरणादायी अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनातील आर्थिक गुंतवणुकीचे महत्व आणि युवकांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर सर्व सहभागी व विजेत्यांना प्रमाणपत्रे आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
हा कार्यक्रम प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. जी. के. सोनटक्के आणि IQAC समन्वयक डॉ. श्रुती जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला. प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांचे सतत प्रोत्साहन व मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या यशामागील प्रेरणास्थान ठरले. प्राणीशास्त्र विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकत्रित परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचे योगदान दिले. या कार्यक्रमासाठी एकूण १७० विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धामध्ये सहभाग नोंदवला. तसेच एकूण ३०० विद्यार्थ्यानी आणि ५५ शिक्षकांनी या स्पर्धांना भेट दिली. या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण होऊन, वन्यजीवांच्या संवर्धनाचे महत्त्व प्रभावीपणे पोहोचविण्यात आले
विवेकानंद महाविद्यालयात राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह 2025 साजरा
|