बातम्या

विवेकानंद कॉलेजमध्ये राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह उत्साहात संपन्न

National Wildlife Week Celebrated with Enthusiasm at Vivekananda College


By nisha patil - 9/10/2026 7:23:39 PM
Share This News:



विवेकानंद कॉलेजमध्ये राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह उत्साहात संपन्न

'कनेक्टिंग हॅबिटॅट्स, ग्रायव्हिंग वाईल्डलाईफ संकल्पनेवर विविध स्पर्धांचे आयोजन

कोल्हापूर दि.09 :  विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथील प्राणीशास्त्र विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ते ८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत कनेक्टिंग हॅबिटॅट्स, ग्रायव्हिंग वाईल्डलाईफ या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. या चार दिवसीय उपक्रमांतर्गत जनजागृती रॅली, विविध स्पर्धा, प्रदर्शन आणि विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सुमारे २५० वि‌द्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला, तर सुमारे ७५० अभ्यागतांनी विविध उपक्रमांना भेट दिली. सप्ताहाचे उद्‌द्घाटन महावि‌द्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. हुजरे यांच्या हस्ते, IQAC समन्वयक डॉ. बी. टी. दांगट यांच्या उपस्थितीत झाले. पहिल्या दिवशी वन्यजीव संवर्धन जनजागृती रॅलीमध्ये ९० वि‌द्यार्थ्यांनी सहभाग घेतला, तर रांगोळी स्पर्धेत ३० वि‌द्यार्थ्यांनी वन्यजीव, संकटग्रस्त प्रजाती आणि अधिवास संवर्धनावर आधारित आकर्षक रांगोळ्या साकारल्या.

दुसऱ्या दिवशी प्राणी छायाचित्रण स्पर्धेत ४२ वि‌द्यार्थ्यांनी ९५ छायाचित्रे सादर केली. हस्तकला मॉडेल स्पर्धेत १७ वि‌द्यार्थ्यांनी परिसंस्था, अन्नसाखळी व अन्नजाळे यांवर आधारित मॉडेल्स तयार केली, तर पोस्टर स्पर्धेत २२ वि‌द्यार्थ्यांनी अधिवासांचा हास, जैवविविधतेची हानी आणि मानव-वन्यजीव संघर्ष यांविषयी प्रभावी संदेश दिले. तिसऱ्या दिवशी आयोजित वन्यजीव प्रश्नमंजुषा स्पर्धेत ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, तर लघुपट स्पर्धेत १८ विद्यार्थ्यांनी वन्यजीव संवर्धन व पर्यावरणीय जबाबदारीवर आधारित लघुपट सादर केले. अंतिम दिवशी चेहरा व हात रंगविण्याच्या स्पर्धेत २० वि‌द्यार्थ्यांनी कलात्मक सादरीकरणातून वन्यजीव संरक्षणाचा संदेश दिला. सर्व स्पर्धामध्ये वि‌द्यार्थ्यांनी मोठ्‌या उत्साहाने सहभाग घेत आपली सर्जनशीलता आणि पर्यावरणाविषयीची संवेदनशीलता व्यक्त केली.

सप्ताहाच्या सांगता समारंभात महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य, कोल्हापूरचे मानद वन्यजीव रक्षक आणि पगमार्क आर्ट गॅलरीचे संचालक श्री. रमण कुलकर्णी यांनी 'उत्तर पश्चिम घाटातील जैवविविधता' या विषयावर व्याख्यान दिले. सुमारे ११० विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित असलेल्या या व्याख्यानात त्यांनी पश्चिम घाटातील समृद्ध जैवविविधता, स्थानिक व दुर्मिळ प्रजाती, पक्षी, फुलपाखरे, बेडूक, ऑर्किड, बुरशी आणि कोळी यांविषयी माहिती दिली. तसेच गिधाडांचे संरक्षण, प्राण्यांचे सामाजिक वर्तन आणि नैसर्गिक अधिवासांचे जतन यांचे महत्व विशद केले. समारोपप्रसंगी विविध स्पर्धातील विजेत्यांना सन्मानचिन्हे व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी महावि‌द्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. हुजरे आणि प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. जी. के. सोनटक्के यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्राणीशास्त्र विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सर्वांचे सहकार्य यांमुळे हा सप्ताह जान, सर्जनशीलता आणि पर्यावरणीय जाणीव यांचा संगम ठरला.   "अधिवास समृद्ध झाले की वन्यजीव समृद्ध होतात आणि वन्यजीव समृद्ध झाले की आपली पृथ्वीही समृद्ध होते," हा संवर्धनाचा संदेश देत राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


विवेकानंद कॉलेजमध्ये राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह उत्साहात संपन्न
Total Views: 11