खेळ

पिराजीराव घाटगे ट्रस्टकडून जलतरणपटूंचा राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय सत्कार..

National and international felicitations to swimmers


By nisha patil - 3/11/2025 5:10:28 PM
Share This News:



पिराजीराव घाटगे ट्रस्टकडून जलतरणपटूंचा राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय सत्कार..

खेळाडूंना व्यसनापासून दूर राहून ध्येय साधण्याचा सल्ला..

पिराजीराव घाटगे ट्रस्टने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड झालेल्या जलतरणपटूंचा भव्य सत्कार केला. दुबई, दिल्ली आणि अहमदनगरमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झालेल्या रुद्र सौरभ मनाडे, शौर्य स्वप्नील खोंद्रे आणि वेदिका दीपक जाधव यांचा भवानी जलतरण तलाव येथे सत्कार करण्यात आला.

श्रीमती सरोज पाटील यांनी खेळाडूंना व्यसनापासून दूर राहून खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. ट्रस्टचे चेअरमन आणि विश्वस्तांनी ट्रस्टच्या सातत्यपूर्ण आणि नि:स्वार्थी कामगिरीचं कौतुक केलं. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवणाऱ्या खेळाडूंना एक वर्ष मोफत प्रशिक्षण देण्याची घोषणा केली.

सत्कार सोहळ्यात ट्रस्टचे प्रशिक्षक, कर्मचारी, जलतरणपटू आणि पालक उपस्थित होते.


पिराजीराव घाटगे ट्रस्टकडून जलतरणपटूंचा राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय सत्कार..
Total Views: 25