शैक्षणिक
शहाजी छत्रपती महाविद्यालयात ‘साहित्य, संस्कृती आणि समाजातील कुटुंब व्यवस्था’ विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र
By Administrator - 9/3/2026 3:06:34 PM
Share This News:
शहाजी छत्रपती महाविद्यालयात ‘साहित्य, संस्कृती आणि समाजातील कुटुंब व्यवस्था’ विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र
कोल्हापूर : दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागामार्फत ‘साहित्य, संस्कृती आणि समाजातील कुटुंब व्यवस्था’ या विषयावर शनिवारी (दि. १४ मार्च) एकदिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या चर्चासत्राचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे असतील.
या वेळी राजाराम कॉलेजच्या इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. रघुनाथ कडाकणे यांचे बीज भाषण होणार आहे. तसेच मुंबई विद्यापीठाचे डॉ. शिवाजी सरगर आणि डॉ. स्मिता आजगावकर-नायक (गोवा) हे साधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
शनिवारी सकाळी दहा वाजता महर्षी विठ्ठल रामजी शिंदे सभागृहात या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन होणार आहे. चर्चासत्रात अभ्यासक, संशोधक व प्राध्यापकांनी सादर केलेल्या संशोधन पेपरच्या प्रोसीडिंगचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. तसेच ‘क्लासिक सागाज इन लिटरेचर’ या विषयावरील वॉलपेपरचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे.
या राष्ट्रीय चर्चासत्रात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण आणि इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. एन. एस. जाधव यांनी केले आहे.
शहाजी छत्रपती महाविद्यालयात ‘साहित्य, संस्कृती आणि समाजातील कुटुंब व्यवस्था’ विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र
|