बातम्या
नवलेवाडी रानडुक्कर शिकार प्रकरण; चार आरोपींना तीन दिवसांची वनकोठडी
By Administrator - 5/3/2026 5:15:51 PM
Share This News:
नवलेवाडी रानडुक्कर शिकार प्रकरण; चार आरोपींना तीन दिवसांची वनकोठडी
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील नवलेवाडी येथे रानडुक्कराच्या मांसाची विक्री करताना पकडलेल्या चार आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची वनकोठडी सुनावली.
वन विभागाने ३ मार्च रोजी संयुक्त गस्तीदरम्यान छापा टाकून भिवाजी उर्फ सरदार संभाजी पाटील (रा. वाकरे), रतन हिंदुराव नवलव, विनायक संभाजी वैद्य आणि रमेश पांडुरंग पाटील (रा. वाघुडे, ता. पन्हाळा) यांना रानडुक्कराच्या मांसासह ताब्यात घेतले. यावेळी कोयता, सत्तुर, वजन काटा तसेच दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना कळे-खेरीवडे येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. पुढील तपास वन विभागाकडून सुरू आहे.
नवलेवाडी रानडुक्कर शिकार प्रकरण; चार आरोपींना तीन दिवसांची वनकोठडी
|