बातम्या
शाही दसरा महोत्सव अंतर्गत महिलांसाठी शनिवारी ‘नवदुर्गा रॅली’ चे आयोजन
By nisha patil - 9/24/2025 3:08:49 PM
Share This News:
शाही दसरा महोत्सव अंतर्गत महिलांसाठी शनिवारी ‘नवदुर्गा रॅली’ चे आयोजन
कोल्हापूर, दि. 24 : कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवला यावर्षी राज्य महोत्सवचा दर्जा मिळाला आहे. या निमित्ताने भारत सरकार, पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र व कोल्हापूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शाही दसरा महोत्सव 2025 अंतर्गत यावर्षी देखील वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांचा सहभाग असणारी नवदुर्गा रॅलीचे (बाईक रॅली) शनिवार, दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8 ते 10 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. जास्तीत जास्त महिलांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन असे आवाहन नवदुर्गा रॅलीच्या संयोजकांनी केले आहे.
रॅली दसरा चौक ते भवानी मंडप - बिंदू चौक - उमा टॉकीज - बागल चौक - राजारामपुरी - उड्डाणपूल - कावळा नाका ते दसरा चौक या मार्गाने ही रॅली मार्गक्रमण करणार आहे. या वर्षीचा सामाजिक संदेश 100 दिवसांच्या आत प्लॅस्टिक मुक्त कोल्हापूर याचे घोषवाक्य, प्रबोधनपर फलक आणि नवनवीन संकल्पना यासह विद्यार्थिनी, शिक्षक, वकील, अधिकारी, पत्रकार, डॉक्टर, परिचारिका, इंजिनियर, पोलीस, होमगार्ड तसेच विविध सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिला उत्साह पूर्ण अशा क्षेत्रांतील महिलांचा सहभाग या रॅलीची शोभा वाढवणार आहे.
रॅलीसाठी सूचना - सर्वांनी आपापले फेटे बांधून यावे. (ऐच्छिक), सर्वांना अल्पोपहार देण्यात येणार आहे, आपल्या ग्रुपच्या नाव नोंदणीची यादी प्रत घेऊन यावे जेणेकरून अल्पोपहार किट देता येईल. तसेच अल्पोपहार किट आपल्या ग्रुपच्या लीडरकडे देण्यात येईल. सहभागी सर्व ग्रुपना प्रशस्तीपत्र देण्यात येईल. तसेच यावर्षी एक ते तीन आणि उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात येणार आहेत, विजेत्या संघाला चेकद्वारे बक्षीस ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. सहभागी महिलांनी शनिवारी दसरा चौक येथे सकाळी आठ वाजता हजर रहावे.
शाही दसरा महोत्सव अंतर्गत महिलांसाठी शनिवारी ‘नवदुर्गा रॅली’ चे आयोजन
|