बातम्या

गोकुळच्‍या चेअरमनपदी नविद मुश्रीफ यांची निवड...

Navid Mushrif elected as Gokul chairman


By nisha patil - 5/30/2025 11:50:12 PM
Share This News:



गोकुळच्‍या चेअरमनपदी नविद मुश्रीफ यांची निवड...

कोल्‍हापूर, ता ३०: गोकुळ दूध संघाच्‍या चेअरमनपदी श्री.नविद हसन मुश्रीफ यांची एकमताने निवड झाली निवडणूक अधिकारी राजकुमार पाटील विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दूग्ध पुणे) यांच्‍या अध्‍यक्षतेखाली निवड करणेत आली. या चेअरमन पदाच्‍या निवडीकरीता सुचक म्‍हणून – श्री.विश्वास नारायण पाटील व अनुमोदक म्‍हणून – श्री.अरुण गणपतराव डोंगळे आहेत.

यावेळी निवडणूक अधिकारी राजकुमार पाटील विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध पुणे), संघाचे माजी चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 


गोकुळच्‍या चेअरमनपदी नविद मुश्रीफ यांची निवड...
Total Views: 60