बातम्या

नवमहाराष्ट्र सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध...

Navmaharashtra spinning mill election unopposed


By nisha patil - 7/5/2025 4:20:24 PM
Share This News:



नवमहाराष्ट्र सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध...

आवाडे कुटुंबीयांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाची निवड

साजणी येथील नवमहाराष्ट्र सहकारी सूतगिरणीची निवडणूक माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी आमदार प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे, स्वप्नील आवाडे यांच्या नेतृत्वात बिनविरोध पार पडली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रदीप मालगावे यांनी काम पाहिले. ही माहिती माणगावचे सरपंच व व्हा. चेअरमन राजू मगदूम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नवनिर्वाचित संचालक मंडळात सर्वसाधारण, अनुसूचित जाती-जमाती, भटक्या-विमुक्त, महिला व संस्था गटांचे प्रतिनिधी बिनविरोध निवडून आले.


नवमहाराष्ट्र सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध...
Total Views: 101