बातम्या

साळगाव येथे भगवा रक्षक तरुण मंडळाचा नवरात्र उत्सव

Navratri festival of saffron guard youth group in Salgaon


By nisha patil - 9/21/2025 10:04:40 PM
Share This News:



साळगाव येथे भगवा रक्षक तरुण मंडळाचा नवरात्र उत्सव

धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची विविधता; २१ वे वर्ष उत्साहात

आजरा (प्रतिनिधी – हसन तकीलदार) : साळगाव (ता. आजरा) येथील भगवा रक्षक कला क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गेली २० वर्षे ग्रामदैवत केदारलिंग मंदिराच्या प्रांगणात दुर्गामाता उत्सव साजरा करण्याची परंपरा मंडळाने जपली असून यावर्षी हा उत्सव २१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.

📌 कार्यक्रमांचे वेळापत्रक :

  • २२ सप्टेंबर – दुपारी १२ वा. दुर्गामाता आगमन सोहळा, रात्री ९ वा. माऊली भजनी मंडळ साळगाव यांचे भजन

  • २३ सप्टेंबर – रात्री ९ वा. केदारलिंग भजनी मंडळ साळगाव यांचे भजन

  • २४ सप्टेंबर – रात्री ९ वा. ह.भ.प. राहुल महाराज कदम (इचलकरंजी) यांचे कीर्तन (कीर्तनसाथ : विठ्ठल रखुमाई सांप्रदाय मंडळ)

  • २५ सप्टेंबर – रात्री ९ वा. शालेय विद्यार्थ्यांसाठी फनी गेम्स

  • २६ सप्टेंबर – दुपारी १२ वा. हळदीकुंकू (महिलांसाठी), रात्री ९ वा. महिला व युवतींसाठी फनी गेम्स

  • २७ सप्टेंबर – रात्री ९ वा. अभिनेते संतोष चव्हाण यांचा स्टेज हिप्नॉटिझम व धमाल कॉमेडी कार्यक्रम

  • २८ सप्टेंबर – रात्री ८ वा. महाप्रसाद

  • २९ सप्टेंबर – रात्री ८ वा. रास दांडिया गरबा

  • ३० सप्टेंबर – सायं. ७.३० वा. महिलांसाठी लकी ड्रॉसह महाआरती, त्यानंतर रास दांडिया गरबा

  • १ ऑक्टोबर – रात्री ८ वा. रास दांडिया गरबा

  • २ ऑक्टोबर – सकाळी ६.३० वा. दुर्गामाता महादौड (सुरुवात : हनुमान-विठ्ठल रुखमाई मंदिर, साळगाव), सायं. ६ वा. विसर्जन मिरवणूक (विशेष आकर्षण : हलगी आणि भागातील प्रथमच नवीन उपक्रम)

दररोज सकाळी ७.३० वा. व सायं. ७.३० वा. केदारलिंग मंदिर व दुर्गामाता उत्सव ठिकाणी आरती होणार आहे.

👉 या सर्व कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष अंकुश पाटील, धनंजय पाटील, संदीप वेंगुळकर, सुभाष पाटील, संदीप केसरकर व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.


साळगाव येथे भगवा रक्षक तरुण मंडळाचा नवरात्र उत्सव
Total Views: 61