बातम्या

हसुर बुद्रुकमध्ये नवसाचा गणपती विसर्जन सोहळा जल्लोषात

Navsas Ganpati immersion ceremony


By nisha patil - 5/9/2025 3:03:46 PM
Share This News:



हसुर बुद्रुकमध्ये नवसाचा गणपती विसर्जन सोहळा जल्लोषात

हसुर बुद्रुक: श्री गणेश मंडळ, हसुर बुद्रुक यांच्या वतीने नवसाचा गणपती विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडला. या निमित्ताने काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

मिरवणुकीदरम्यान कार्यकर्त्यांनी लाठी-काठीचे आकर्षक प्रदर्शन सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली. महिलावर्गानेही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आपला उत्साह दाखवला. यावेळी शिवप्रतिज्ञा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जागवण्यात आले.

गावातील लहान मुले, युवक-युवती, ज्येष्ठ नागरिकांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि "गणपती बाप्पा मोरया"च्या जयघोषात विसर्जन सोहळा पार पडला. वातावरणात भक्तीभाव आणि जल्लोषाचे अनोखे दर्शन घडले.


हसुर बुद्रुकमध्ये नवसाचा गणपती विसर्जन सोहळा जल्लोषात
Total Views: 135