बातम्या

नीरज चोप्राची दमदार सुरुवात ; 2025 हंगामात पहिले सुवर्णपदक पटकावले

Neeraj Chopras strong start


By nisha patil - 4/17/2025 4:44:16 PM
Share This News:



नीरज चोप्राची दमदार सुरुवात ; 2025 हंगामात पहिले सुवर्णपदक पटकावले

भारताचा दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने 2025 च्या हंगामाची विजयी सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेत बुधवारी पार पडलेल्या पॉटशेफस्ट्रूम नॅशनल ट्रॅक अँड फिल्ड स्पर्धा  मध्ये नीरजने 84.52 मीटरची भालाफेक करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
 

या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहा खेळाडूंमध्ये नीरजने अव्वल स्थान पटकावले, तर आफ्रिकेचा 25 वर्षीय खेळाडू स्मितने 82.44 मीटरच्या कामगिरीसह दुसरा क्रमांक मिळवला. नीरजची ही कामगिरी त्याच्या वैयक्तिक सर्वोत्तम म्हणजेच 89.94 मीटरपेक्षा कमी असली, तरी हंगामाच्या सुरुवातीस ही एक उत्साहवर्धक कामगिरी मानली जात आहे. सध्या तो चेक प्रजासत्ताकचे प्रशिक्षक जान जलेजनी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. नीरजची पुढील स्पर्धा 16 मे रोजी कतारच्या दोहामध्ये होणाऱ्या डायमंड लीगमध्ये आहे. याशिवाय, मे महिन्यात भारतात होणाऱ्या वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स कॉन्टिनेन्टल टूर भालाफेक स्पर्धेतही तो आपली उपस्थिती दर्शवणार आहे.


नीरज चोप्राची दमदार सुरुवात ; 2025 हंगामात पहिले सुवर्णपदक पटकावले
Total Views: 246