विशेष बातम्या
माजी मुख्याध्यापिका सौ. माधुरी कोरडे यांना नेहरू हायस्कूलतर्फे श्रद्धांजली
By nisha patil - 11/12/2025 5:45:03 PM
Share This News:
माजी मुख्याध्यापिका सौ. माधुरी कोरडे यांना नेहरू हायस्कूलतर्फे श्रद्धांजली
कोल्हापूर : मोहामेडन एज्युकेशन सोसायटी संचलित नेहरू हायस्कूल, उर्दू हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज यांच्या माजी मुख्याध्यापिका सौ. माधुरी कोरडे यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. नेहरू हायस्कूलतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या प्रसंगी संस्थेचे चेअरमन गणी आजरेकर यांनी कोरडे मॅडम यांच्या कार्याची आठवण करून दिली. विद्यार्थिनींच्या बाबतीत त्यांचा जिव्हाळा, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि विद्यार्थ्यांवरील प्रेम यांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, “त्या मुख्याध्यापिका पदावर असताना अतिशय प्रभावीपणे काम केले. रिटायर्ड झाल्यानंतरही शाळेत येऊन विद्यार्थ्यांची, विशेषतः मुलींची, विचारपूस करणे त्यांना आवडायचे. मुलींच्या मनात कोरडे मॅडमविषयी विशेष प्रेम आणि आदर होता.”
श्रद्धांजली कार्यक्रमाला संस्थेचे प्रशासक हाजी कादरभाई मलबारी, शालेय समिती चेअरमन रफीक शेख, संचालक रफीक मुल्ला, हाजी लियाकत मुजावर, हाजी जहाँगीर अत्तार, मुख्याध्यापक काझी S.S., शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी मुख्याध्यापिका सौ. माधुरी कोरडे यांना नेहरू हायस्कूलतर्फे श्रद्धांजली
|